loader
Breaking News
Breaking News
Foto

मळगाव घाटातील धबधब्याचे सौंदर्य झाडाझुडपांमुळे झाकले

सावंतवाडी–शिरोडा राज्यमार्गावरील मळगाव घाटात असलेला नैसर्गिक धबधबा पर्यटकांचे आणि वाहनधारकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. मात्र, सध्या धबधब्याभोवती दाट झाडी व झुडपांची वाढ झाल्याने त्याचे नैसर्गिक सौंदर्य हरवले आहे. मुख्य राज्यमार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. घाटातून जाताना या धबधब्याकडे अनेकांचे लक्ष वेधले जाते. काही काळापूर्वी या धबधब्याच्या सुशोभीकरणासाठी तब्बल पाच लाख रुपये खर्च करण्यात आले होते. तरीही झाडाझुडपांची छाटणी न झाल्याने सध्या धबधबा पूर्णपणे झाडीत हरवून गेला आहे. धबधबा वनविभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे येथील झाडाझुडपे तातडीने तोडून परिसर स्वच्छ करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी तसेच या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, झाडाझुडपे हटविल्यास धबधब्याचे सौंदर्य पुन्हा खुलून येईल आणि पर्यटकांना आकर्षित करेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg