loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड तालुक्यातील तळवडे पं.स.तळवडे अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता आरक्षित

देवगड (दयानंद मांगले) - देवगड तहसीलदार कार्यालयात आयोजित केलेल्या पंचायत समिती आरक्षण सोडतीत ३२ तळवडे अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झाला असून नामाप्र महिलासाठी २३ पुरळ, ३४ कोटकामते, हे राखीव झाले आहेत. २७ बापर्डे, ३० फणसगाव, ३१ शिरगाव, आणि ३३ किंजवडे हे प.स.गण सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता आरक्षित झाले आहेत. उर्वरित २४ तिर्लोट, २५ पडेल, २६ नाडण, २८ मणचे, ३५ मुणगे, ३६ कुणकेश्वर हे प.स.गण सर्वसाधारण गटाकरिता आरक्षित झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार जल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसारधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरीता देवगड पंचायत समिती सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरीता विशेष सभा १३ ऑक्टोबर रोजी स. ११ वा. तहसीलदार कार्यालय देवगड याठिकाणी निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रमेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थी रीषभ कोयंडे, काव्या फरांदे यांच्या हस्ते काढण्यात आली.

टाईम्स स्पेशल

यावेळी निवडणूक नायब तहसीलदार छाया आखाडे, मंडल अधिकारी विनायक शेट्ये, लिपिक प्रदिप कदम उपस्थित होते. राजकीय पक्षाचे भाजप तालुका अध्यक्ष राजा भुजबळ, शिवसेना उबाठा तालुका प्रमुख रविंद्र जोगल, जयेश नर, शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर, भाजप तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, महेश जंगले, अमित साटम, दयानंद पाटील, संतोष फाटक, मकरंद जोशी अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg