loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर पंचायत समितीच्या १० गणाचे आरक्षण जाहीर

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या आरक्षण सोडत कार्यक्रम नुकताच गुहागर पंचायत समिती सभागृह येथे पार पडला. या पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत निरीक्षण अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्या देखरेखीखाली तसेच गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी यावेळी नायब तहसीलदार महेंद्र सावर्डेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडत मध्ये पाचेरी सडा पंचायत समिती गण मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, शृंगारतळी पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग, मळण पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, शीर पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, असगोली पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, अंजनवेल पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, कोंड कारूळ पंचायत समिती गण सर्वसाधारण अनारक्षित, पडवे पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण, तळवली पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण, वेळणेश्वर पंचायत समिती गण अनारक्षित सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. अनेक पंचायत समिती गणांमध्ये मध्ये महिला आरक्षण पडल्याने विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न भंगले असल्याची चर्चा सुरू होती, तर पंचायत समिती गण मध्ये स्त्री राखीव पडल्याने इच्छुक पदाधिकारी आतापासूनच महिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

असगोली व अंजनवेल पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने या ठिकाणी सर्वच पक्षाना महिलांची शोधाशोध करावी लागेल हे निश्चित आहे. तर काही ठिकाणी सदस्य पदांसाठी महिलांमध्ये चुरस निर्माण होईल अशी ही स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसाधारण अनारक्षित पडलेल्या कोंड कारूळ, पडवे, तळवळी, वेळणेश्वर चारी गणांच्या जागांवर सर्वच पक्षातून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असल्याने या जागांवर अटीतटीची लढत होणार हे निश्चित असून आतापासूनच इच्छुक उमेदवार पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी करत असल्याचे दिसून येत आहे.गुहागर पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी विविध पक्षातील माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक व पत्रकार बंधू उपस्थित होते. शेवटी तहसीलदार परीक्षित पाटील यांनी सर्वांचे सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. सर्व नागरिकांच्या वतीने पत्रकार निसार खान यांनी या आरक्षण सोडत कार्यक्रमाचे गुहागर महसूल विभागाने योग्य नियोजन केल्याने आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg