loader
Breaking News
Breaking News
Foto

रसाळगडावर घरडा इन्स्टिट्यूटचा पर्यावरण, वारसा आणि स्वच्छतेसाठी NSS स्वयंसेवकांचा आदर्श उपक्रम

खेड (प्रतिनिधी)- खेड तालुक्यातील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्यावर घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लव्हेल यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटतर्फे सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धनाशी निगडित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व गडसंवर्धन जनजागृती कार्यक्रम पार पडले. या अंतर्गत आंबा, काजू, धुप, ब्लूबेरी आदी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यासोबतच ऐतिहासिक वारसा जतन आणि गडसंवर्धन जनजागृतीसाठी पोवाडा गायन स्पर्धा तसेच गडसंवर्धन विषयावरील वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यानंतर २ ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती निमित्त “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत रसाळगड किल्ल्यावर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व उपक्रमांमध्ये एकूण ३६ NSS स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्थानिक रसाळवाडी ग्रामस्थ, श्री झोलाई वाघजाई देवी मंदिर समितीचे सदस्य यांनी सक्रिय सहकार्य केले. उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमांचा लाभ घेत प्रशंसाही व्यक्त केली. हे उपक्रम घरडा इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या संकल्पनेतून, NSS युनिट प्रमुख प्रा. व्ही. डी. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा. विनायक म. माळी यांच्या नियोजनातून तसेच प्रा. पी. एल. वरक व प्रा. पी. ए. सदापुरे यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सामाजिक जबाबदारी, सांस्कृतिक जतन आणि ऐतिहासिक वारसा जपण्याची प्रेरणा निर्माण झाली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg