loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प.आदर्श शाळा शिवणे नं.2 येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणादिन उत्साहात

आबलोली(संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवणे नं. 2 येथे भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणादिन उत्साहात आणि थोर आदर्शांच्या स्मृतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या परिसरात ज्ञान, प्रेरणा आणि अनुशासनाचे वातावरण फुलून आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी “डॉ. कलाम यांचे जीवन आणि कार्य” या विषयावर विचारमंथन सादर केले. ‘मोठी स्वप्ने बघा, ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात आहे’ या त्यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी भावपूर्ण पद्धतीने उच्चार करून वातावरण प्रेरणादायी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी मुख्याध्यापक दिनेश जाक्कर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करताना “डॉ. कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य ज्ञानार्जन आणि राष्ट्रसेवेला अर्पण केले. त्यांच्या कार्यातून आपल्याला वाचन, विज्ञान आणि कर्तृत्व यांचे महत्त्व शिकण्यास मिळते. वाचनामुळे विचार समृद्ध होतात आणि माणूस प्रगल्भ बनतो.”अशी मौलीक माहिती दिली. यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी एकत्र बसून एक तास वाचन करून डॉ. कलाम यांना अभिवादन केले. विविध पुस्तकांमधील प्रेरणादायी कथा, जीवनमूल्ये आणि वैज्ञानिक माहिती यांचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. काही विद्यार्थ्यांनी वाचनानंतर आपल्या भावना आणि अनुभव कथन केले, ज्यामुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाचे आयोजन शिक्षकवृंदाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सुत्रसंचालन उपशिक्षक प्रदीप बोन्द्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी “दररोज वाचन करू, ज्ञानाचा दीप पेटवू” असा वाचन संकल्प घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली, आत्मविश्वास वाढला आणि डॉ. कलाम यांच्या आदर्शांचे स्मरण करत ज्ञानार्जनाची प्रेरणा मिळाली. शाळेचे वातावरण खऱ्या अर्थाने ज्ञानमय आणि प्रेरणामय झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg