loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण येथील पंचायत समितीच्या १२ गणांसाठीची आरक्षण सोडत

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील पंचायत समितीच्या १२ गणांसाठीची आरक्षण सोडत आज येथील तहसील कार्यालयात भूसंपादन जिल्हाधिकारी शुभदा पोवार, तहसीलदार वर्षा झालटे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंचायत समितीच्या १२ गणांची आरक्षण सोडत कार्यक्रम आज पार पडला. यावेळी माजी उपसभापती अशोक बागवे, चौके सरपंच पी. के. चौकेकर, देवानंद लुडबे, दत्ता पोईपकर, संजय पाताडे, विरेश पवार यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी श्रीनिका निखिल नागवेकर हिच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गण निहाय आरक्षण असे- पेंडूर- अनुसूचित जाती महिला, कुंभारमाठ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कोळंब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, शिरवंडे- नागरिकांचा मागास प्रवर्ग, आडवली-मालडी- सर्वसाधारण महिला, पोईप- सर्वसाधारण महिला, वराड- सर्वसाधारण महिला, चिंदर- सर्वसाधारण, आचरा- सर्वसाधारण, मसुरे-मर्डे- सर्वसाधारण, वायरी भूतनाथ- सर्वसाधारण, सुकळवाड- सर्वसाधारण असे जाहीर करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार प्रिया हर्णे, विनायक जांभेकर, एन. ए. प्रभुदेसाई, महसूल सहायक एम. जी. गवस, आनंद तोंडवळकर आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg