loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड जिल्ह्यात जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा विजय: शेल इंडियाच्या कामगारांना तब्बल १ लाख २० हजार रुपये बोनस

पनवेल (प्रतिनिधी)- देशातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण असलेल्या दिपावलीनिमित्त कामगारांना त्यांच्या आस्थापनांकडून बोनस दिला जातो. यंदा रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये बोनस वाटपाच्या चर्चांना वेग आला असताना, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगारनेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेने कामगारांच्या हिताचे भक्कम प्रतिनिधित्व करून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड मधील कामगारांना यंदा तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा सर्वाधिक बोनस मिळवण्यात यश संपादन केले आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी १ लाख २५ हजार रुपये आणि त्या पुढील वर्षी १ लाख ३० हजार रुपये कामगारांना बोनस देण्यात येणार आहे. त्या संदर्भातील करार कंपनी आणि कामगार संघटनेत झाला. या करारावर व्यवस्थापनाच्यावतीने अधिकारी शशांक शेखर व गुलशन चौधरी यांनी तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी तसेच कामगार प्रतिनिधींनी स्वाक्षर्‍या केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कंपनीतील बहुतांश कामगारांनी संघटनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यावेळी कामगारांना भरघोस पगारवाढ व सुविधा यापूर्वीच देण्यात आल्या. संघटनेच्या या यशामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. आज संघटनेचे सल्लागार लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची संघटनेचे पदाधिकारी व कामगार प्रतिनिधींनी सदिच्छा भेट त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले. यावेळी रामदास गोंधळी, सुनील पाटील, यासिम शेख, अनिल पावशे, जयराम जाधव, सुनील हरिश्चंद्रकर आदी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी याबद्दल बोलताना सांगितले कि, म्हणाले की, कामगारांचे हक्क मिळवण्यासाठी संघटना सदैव तत्पर असते. या वर्षीही अनेक चर्चांनंतर कामगारांना योग्य तो बोनस मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. कामगार आणि कंपनी यांचे नाते घट्ट असले पाहिजे, कारण त्यामुळे कंपनी आणि कामगार यांचे भले होते. जय भारतीय जनरल कामगार संघटना कामगारांच्या हक्कासाठी लढत असते. त्यामुळे ती जबाबदारी घेऊन संघटना काम करत असते, असेही जितेंद्र घरत यांनी नमूद केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg