केळंबे (लांजा) (सिराज नेवरेकर) - अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पक्षाचे काम करणारा कार्यकर्ता म्हणून रत्नागिरी जिल्हा सुरेशभाईंकडे पहात आहे. सलग पाच वर्षे अग्रगण्य बँक असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले. परंतु या सत्तेचा आणि मोठेपणाचा गर्व भाईंना कधी झाला नाही. ग्रामीण भागात काम करत असताना आपल्या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या मर्यादा, सामान्य कार्यकर्त्यांच्या काय अडचणी आहेत, या सुरेशभाई यांनी जाणून घेत त्या सोडवण्याचा निर्विवादपणे प्रयत्न केला. आजचे राजकारण आणि त्यावेळचे राजकारण यामध्ये जमिन अस्मानाचे अंतर आहे. माणसाने आपले कर्तव्य, कर्म करत रहायचे आहे. फळाची अपेक्षा करु नये, या उक्तीप्रमाणे सुरेशभाई साळुंखे यांचे व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते महंमदभाई रखांगी यांनी येथे केले.
सहकार क्षेत्रात काम करणारे, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुरेशभाई साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया मंगल कार्यालय भांबेड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साही वातावरणात, थाटामाटात सुरेशभाई साळुंखे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाईंचे जुने मित्र भाई शिरवटकर, र.जि.म.बँकेचे संचालक महेश खामकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, सामाजिक कार्यकर्ते महंमदभाई रखांगी, कोर्ले गावचे सरपंच गणेश साळुंखे, महेश साळुंखे, मनोहर पाटोळे, विलास सांवत, हरेश जाधव, संजय आयरे, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, परवेज घारे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश राणे, लांजा न्यु एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह महेश सप्रे, उद्योजक अकबर नाकाडे, उद्योजक जयवंत विचारे, कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश लांजेकर, शिवसेना पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल कुरुप, लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, हेमंत शेट्ये, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सचिन भिंगार्डे, माजी नगरसेवक लल्या कुरुप, सुनिल कानडे, ऍड. सदानंद गांगण, अरविंद जाधव, दीपक नागवेकर, प्रकाश जाधव, श्रीकृष्ण हेगिष्ट्ये, लांजा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुभाष लाखण, बावा गाडे, प्रदीप बेंडखळे आदींसह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी सुरेशभाई साळुंखे यांच्या मुली, जावई ,बहीण व सर्व कुटुंबिय व ग्रामीण भागांतील नागरीक मोठ्या संख्येत भाईंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी सुरेशभाई साळुंखे यांनी माझ्या यशात सहकार क्षेत्रातील अनेकांचे योगदान आहे, त्यामुळेच मी यशस्वी होऊ शकलो, असे प्रांजळपणे सांगत आज आपल्या प्रेमाने मी भारावून गेलो, असेच प्रेम आणि आशीर्वाद राहूद्या, अशा शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले. हे प्रेम पाहून ते भारावले. सुरेशभाई साळुंखे यांच्यावर उपस्थितांकडून पुष्पवृष्टी करून त्यांचे अनोखे स्वागत कार्यक्रमस्थळी करण्यात आले. कुटुंबियांसमवेत केक कापून भाईंचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी सुरेशभाईंचे जुने मित्र भाई शिरवटकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सुरेशभाईंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नागवेकर, अरविंद जाधव यांनी केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.