loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या मदतीला धावले सामाजिक कार्यकर्ते

सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि आरोग्यसेवेतील ताण कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अनिल निरवडेकर आणि युवा नेते विशाल परब यांनी रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी एक डॉक्टर आणि तीन नर्स यांची जबाबदारी स्वीकारली आहे. याबद्दल बोलताना अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकी जपत आम्ही ही सेवा देणार आहोत. अस्वस्थ स्वास्थ्य आणि धगधगती सावंतवाडी, उपजिल्हा रुग्णालयाची बदनामी नको, पण जनतेचे हालही नकोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. संवेदनशील नागरिक म्हणून ही समस्या त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या कानावर घातली. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची मार्गदर्शक भूमिका दिशादर्शक ठरली. त्यानंतर डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अ‍ॅड. निरवडेकर यांनी स्पष्ट केले की, एक डॉक्टर आणि तीन नर्स यांची नेमणूक झाल्यावर काही प्रमाणात रुग्णसेवा प्रश्नावरील ताण कमी होईल. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मी (अनिल निरवडेकर) आणि विशाल परब मिळून त्यांचे मानधन देणार आहोत. सकारात्मक दृष्ट्या रुग्णांची सेवा करण्यात येणार आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. शंतनु तेंडुलकर आणि रवी जाधव उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे म्हणाले, डॉ. शंतनु तेंडुलकर यांनी रुग्णालयात यापूर्वी काम केले आहे आणि ते सध्या रुग्णालयातील डायलिसिस सेंटर सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी विनंती करण्यात आली. त्यांनी आपले खासगी रुग्णालय सांभाळून सेवा देण्यासाठी तयारी दर्शवली आहे. डॉ. शंतनु तेंडुलकर म्हणाले, माझे खासगी रुग्णालय आहे ते सांभाळून मी सेवा देईन. उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सांभाळत आहे, ते सांभाळून रुग्णांना सेवा देईन. पण रुग्णालयाची, डॉक्टरांची बदनामी थांबून सामाजिक दृष्ट्या विचार केला पाहिजे, तरच वैद्यकीय सेवा देताना ताण येत नाही. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg