loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणभूमीतील न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद न्याय मिळेल

मंडणगड :- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते रविवारी पार पडले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेले आंबवडे ज्या मंडणगड तालुक्यात आहे, त्याच मंडणगडमध्ये हे न्यायमंदिर आणि बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे, हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचे मत याप्रसंगी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. हे मंदिर न्यायाचे आणि घटनेचे मंदिर आहे याची जाणीव हा पुतळा आपल्याला सदैव करून देईल, असेदेखील ते म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर, कोल्हापूर खंडपीठाचे पहिले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायाधीश माधव जामदार, गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, रत्नागिरीचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश विनोद जाधव, दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी, बार कौन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत, संग्राम देसाई आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात या न्यायालयाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीला मंजुरी देण्यात आली. मात्र याचे खरे श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई यांनाच जाते. या न्यायालयाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले होते आणि लोकार्पणही त्यांच्याच हस्ते होत आहे हा दुग्धशर्करायोग आहे. ज्या पद्धतीने समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केला, त्याचप्रमाणे या कोर्टाचे काम करणार्‍या कामगारांचा सन्मान याच मंचावर झाला. हेच या सोहळ्याचे खरे वेगळेपण आहे, असे ना. एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg