loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात तीन महानगरपालिकेला दिवाळी बोनस जाहीर

ठाणे (प्रतिनिधी) : राज्यातील तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये बोनस जाहीर केल्याची घोषणा केली आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना २४ हजार ५०० रुपये बोनस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सबंधित मनपा आयुक्तांना हे बोनस कर्मचाऱ्यांना त्वरित देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४ हजार ५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या ९ हजार २२१ कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. गेल्यावर्षी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने २४ हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सन २०२५ साठी महापालिका कर्मचाऱ्यांना ५०० रुपयाची वाढ करून २४ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. हे सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करण्यात येणार आहेत.

टाईम्स स्पेशल

ठाणे महापालिकेचे ६ हजार ०५९ कर्मचारी, शिक्षण विभागाचे ७७४ कर्मचारी, परिवहन विभागाचे १ हजार ४०० कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे ९८८ कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे, ठाणे महापालिकेवर सानुग्रह अनुदानापोटी सुमारे २३ कोटी इतके अतिरिक्त दायित्व येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg