loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यात गरीब कुटुंबातील हतबल मुलीवर अत्याचार ?

चिपळूण/खेड- खेड तालुक्यातील लोटेनजीक एका आश्रम परिसरात मुलीच्या शोषणाची तक्रार दाखल केल्याचे शोषित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. लोक हितासाठी काम करणार्‍या अशा संस्थेमध्ये अनितीपूर्ण काही घडू शकते यावर अजूनही कोणाचा विश्वास बसू शकत नाही, कारण या संस्थेचे कार्य दर्जेदार आहे. खरोखरच सदर मुलीवर अत्याचार झाला असेल तर मग कोणी असो कठोर शासन झाले पाहिजे, असे परिसरातील नागरिकांत बोलले जात आहे. चांगल्या आड वाईट काहीच करता येणार नाही, मुलगी गरीब कुटुंबातील असून हतबल असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सदर मुलीच्यासोबत व कुटुंबीयांच्यामागे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सुजाण किर्तनकार, गावकरी असल्याचे समजते. हाती आलेल्या व्हायरल वृत्तानुसार खेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. पण अधिकृतपणे यास दुजोरा अजून पोलिसांनी दिलेला नाही, यामागे कोणते दडपण आहे? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg