loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण पोलीस ठाणे येथे सायबर गुन्हे अनुषंगाने जनजागृतीपर मार्गदर्शन

मालवण (प्रतिनिधी) - सायबर गुन्हे रोखण्यासाठी व फसवणूक टाळण्यासाठी सर्वांनी सजग आणि सतर्क असले पाहिजे, असे मार्गदर्शन मालवण पोलीस ठाणे येथे पोलीस पाटील यांच्यासाठी आयोजित जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमात करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून सायबर जनजागृती, जनसंवाद मोहीम अंतर्गत मालवण पोलीस ठाणे येथे सायबर पोलीस सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सायबर तक्रारी तसेच सायबर गुन्हे अनुषंगाने जनजागृती मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मालवण पोलीस ठाणे अंतर्गत उपस्थित पोलीस पाटील यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच याबाबत गावागावात जनजागृती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, मार्गदर्शक महिला पोलीस धनश्री परब, स्नेहल जावकर, पोलीस कर्मचारी सुशांत पवार आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg