loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड शहरातील ऐतिहासिक बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था

खेड (प्रतिनिधी) : - शहरातील ऐतिहासिक बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था झाली असून येथील नगरपरिषदेने व शासनाच्या पुरातत्व विभागाने त्वरीत साफसफाई करून लोकांसाठी उपलब्ध करुन द्यावे , असे विनम्र आवाहन महाराजा प्रतिष्ठानचे सचिव व दुर्गसेवक प्रणव मापुस्कर यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्हा हा समाजसेवक व देशभक्तांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक गडकोट तसेच ऐतिहासिक वास्तू रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. त्यापैकीच खेड शहरातील आगळ्या-वेगळ्या वैशिष्ट्यांबरोबर इतिहासाची साक्ष देणारी लेणी आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही लेणी एसटी बस स्थानकाच्या डाव्या बाजूला आहेत. सुमारे २ हजार ५०० वर्षापूर्वीची ही बौद्धकालीन लेणी आहेत. हि लेणी संरक्षित असून या लेण्यांच्या अंतर्गत भागात प्रत्येकी दोन स्तंभ व अर्धस्तंभ एक गोल आकाराचे चैत्य आहे. तसेच दालनाच्या उजव्या बाजूला स्तूप आहे याचीहि दुरवस्था झाली आहे., मात्र या बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तरी खेड नगरपरिषद प्रशासन व शासनाच्या पुरातत्व विभागाने त्वरित साफसफाई करून लोकांसाठी उपलब्ध करून द्यावीत असे विनम्र आवाहन महाराजा प्रतिष्ठानचे सचिव व दुर्गसेवक प्रणव मापुस्कर यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg