loader
Breaking News
Breaking News
Foto

नातूनगर येथे मर्सिडीज गाडीला आग; तात्काळ फायर ब्रिगेडच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

खेड (दिलीप देवळेकर) — रात्री सुमारे २:५० वाजता नातूनगर (ता. खेड) येथे प्रवासादरम्यान एका मर्सिडीज बेंझ गाडीला अचानक आग लागली. ही आग खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने विझवण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही गाडी MH 02 BZ 1400 क्रमांकाची असून तिचे मालक संदेश राजेश चवळे आहेत. गाडीत एकूण तीन प्रवासी होते, जे वेळीच बाहेर पडल्यामुळे सर्वजण सुखरूप आहेत. ही मंडळी नाशिकहून गुगल मॅपच्या मार्गदर्शनाने महाड–नातूनगरमार्गे गणपतीपुळे येथे जात होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आग लागल्याचे समजताच खेड नगरपरिषदेचे फायर ब्रिगेड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फायरमन श्याम देवळेकर, दिपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव, सहायक फायरमन जयेश पवार आणि प्रणय रसाळ यांनी धाडसाने आणि कौशल्याने आग विझवण्याचे काम केले. त्यांच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg