loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेची तयारी, माजी आमदार राजन तेली यांनी दिला कानमंत्र

कणकवली (प्रतिनिधी)- आगामी कणकवली नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) पक्षाने तयारीला सुरुवात केल्याचे चित्र आहे. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत रिंगणात उतरण्याची तयारीच्या अनुषंगाने कणकवली शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यात कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सक्रिय होण्याचे आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कणकवली नगरपंचायतीची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. कुडाळ-मालवण मतदार संघाचे आम. निलेश राणे यांनी कणकवलीमध्ये माजी आमदार राजन तेली यांच्या स्वागताला उपस्थिती लावली. त्यानंतर शनिवारी शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक राजन तेली यांच्या निवासस्थानी पार पडली. माजी आम. राजन तेली यांच्याकडे पक्षाच्या वरिष्ठांनी जबाबदारी सोपविली आहे. राजन तेली यांनी निवासस्थानी बैठक घेत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg