loader
Breaking News
Breaking News
Foto

वायंगणी नळेकरवाडी येथील ग्रामस्थांचा दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मालवण (प्रतिनिधी) - उबाठा सेनेचा बालेकिल्ला असलेल्या वायंगणी गावात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सुरुंग लावत वायंगणी नळेकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा मंगळवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांच्या विकास पर्वाने प्रेरीत होऊन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी त्यांच्या स़ोबतजिल्हा उपाध्यक्ष महेश राणे, तालुकाध्यक्ष विनायक बाईत, विभाग प्रमुख संतोष कोदे, सरपंच रुपेश पाटकर, डाँ. प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, मनोज हडकर, नवनियुक्त शाखा प्रमुख गणेश सावंत, युवा शाखा प्रमुख हर्षद दुखंडे, संजय सावंत यांसह शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

यावेळी सामंत यांनी वायंगणी गाव विकासासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही देत नळेकर वाडीतील ग्रामस्थांची मागणी असलेल्या गणेश घाट, स्वामी समर्थ मठ, वायंगणी तिठा येथे हायमास्ट उभारण्यासाठी तसेच वीज समस्या निवारण्यासाठी लवकरच ट्रान्सफार्मर, उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg