दापोली (वार्ताहर) : दापोलीकरांचे कंबरडे मोडणारी दरवाढ करण्याचा विषय दापोली नगरपंचायतीचे सत्ताधार्यांनी सर्वसाधारण सभेपुढे आणला असून यासाठीच सत्ताबदल केला आहे का असा सवाल दापोलीच्या माजी नगराध्यक्षा ममता मोरे यांनी केला आहे. दापोली नगरपंचायतीची ता. २६ रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती मात्र ती पुढे ढकलण्यात आली असून या सभेत विविध विभागातील करांचे दर वाढविण्याचा विषय ठेवण्यात आला आहे. मात्र प्रस्तावित दरवाढ हि काही ठिकाणी दुपटीपेक्षा जास्त असून त्यामानाने नगरपंचायत कोणतीही सुविधा दापोलीकरांना देत नाही.
या प्रस्तावित दर वाढीमध्ये जन्म मृत्यू विभाग नवीन दाखला फी ३० वरून १०० रुपये, जुना दाखला १०० वरून २००, लोकसंख्या दाखला १०० वरून ५००, स्मशानभूमी लाकडे शहरातील नागरिक १५०० वरून २५००, मालमत्ता कर विभाग घर उतारा फी २० वरून १००, चटई क्षेत्र दाखला ५० वरून १५०, थकबाकी नसल्याचा दाखला ५० वरून १५०, बाजार कर ५० वरून १००, मच्छी मार्केट कर १५ वरून ५०, स्वच्छता व आरोग्य विभाग घनकचरा कर १५० वरून ५०० रुपये प्रतिवर्षी, नगररचना विभाग झोन दाखला ३०० वरून १०००, भागश: नकाशा शुल्क ३०० वरून १०००, विज मिटर ना हरकत ६०० वरून १५००, वृक्ष ना परतावा रक्कम ५००० वरून १०,०००, पाणीपट्टी १२०० वरून ४००० प्रतिवर्ष अशी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
ही दरवाढ नगरपंचायतीचे उत्पन्न वाढ करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आली असून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या विषयाला विरोध करणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले. दरम्यान दापोली नगरपंचायतीमध्ये आम्ही उघड केलेला करोडो रुपयांच्या अपहारातील १ रुपयाही वसूल करण्यात सत्ताधार्यांना यश आलेले नाही, सत्ताधार्यांनी हे पैसे वसूल करून दाखविल्यास हि दरवाढ करण्याची आवश्यकता नसल्याचेही ममता मोरे यांनी सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.