loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोली चेकपोस्टवर गोवा बनावटीची दारू घेऊन जाणारी इनोव्हा पकडली; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

सावंतवाडी (प्रतिनिधी):- ​आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे वाहनांची तपासणी करत असताना, गोवा बनावटीची अवैध दारू घेऊन जाणारी इनोव्हा गाडी (क्र. MH ०२ BD २९१७) पोलिसांनी पाठलाग करून चौकुळ रस्त्यावर पकडली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी इनोव्हा गाडी आंबोली चेकपोस्टवर थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर न थांबता पळून गेली. पोलिसांनी तातडीने सरकारी वाहनाने तिचा पाठलाग सुरू केला. चौकुळ रस्त्यावर चौकुळ येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्ता अडवून ही गाडी थांबवण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गाडीची तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे २० बॉक्स दारू आढळून आले. या दारूची किंमत १ लाख २ हजार रुपये आहे. दारू वाहतुकीसाठी वापरलेली ५ लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी व दारू असा एकूण ६ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ​या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक सतीश भीमराव आर्दळकर (रा. अडकूर, चंदगड, कोल्हापूर) आणि अविनाश दशरथ पाटील (रा. बोंदुर्डी, चंदगड, कोल्हापूर) या दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा नोंद करून अटकेची कारवाई सुरू आहे. ​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या पथकाने केली. पथकात हवालदार संतोष गलोले, रामदास जाधव, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे आणि गौरव परब यांचा समावेश होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg