दापोली (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, दापोली तालुका सेवा समितीच्यावतीने जालगाव येथील सरस्वती विद्यामंदिर येथे बालिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुप्रसिद्ध विधीज्ञ अॅड. मनीषा जोशी यांनी मुलींना कायदेशीर हक्क, सुरक्षितता, शिक्षण आणि आत्मविश्वास या विषयांवर मार्गदर्शन केले. अॅड. जोशी यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनात सांगितले की, भारतीय राज्यघटनेने मुलींना शिक्षणाचा, संरक्षणाचा आणि पोषणाचा अधिकार दिला आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा, सतीप्रथा बंदी, विधवा पुनर्विवाह व संपत्तीतील अधिकार यांमुळे महिलांचे स्थान समाजात अधिक मजबूत झाले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आजची स्त्री सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत सर्व जबाबदार्या समर्थपणे पार पाडत आहे. कायद्याने मुलींना सर्व प्रकारचे संरक्षण दिले असून, ‘पोक्सो कायद्या’मुळे मुलींना स्वतःवर होणार्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणे सोपे झाले आहे.
अॅड. जोशी यांनी सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता ठेवण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून होणार्या गुन्ह्यांविषयी मुलींनी माहिती ठेवावी आणि अशा चुकीच्या गोष्टी घडल्यास पालक व शिक्षकांशी त्वरित संवाद साधावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक सारिका गुजराथी, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत तांबे, शाळा समन्वयक वर्षा वानरकर, तसेच विविध समित्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. विशाखा समितीच्या पायल बराटे, सखी सावित्री समितीच्या सायली मोरे, विद्यार्थी सुरक्षा समितीच्या पूजा दिंडे आणि माता-पालक समितीच्या प्राजक्ता गद्रे यांनी शिबिराच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या उपक्रमाचे उद्दिष्ट बालिकांना सक्षमीकरण, कायदेशीर हक्कांची जाणीव आणि आत्मविश्वास वाढविणे हे होते. दापोली सेवा समितीचे सदस्य मनोज पवार यांनी सांगितले की, या शिबिराद्वारे मुलींना स्वावलंबी बनविणे आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान मुलींनी विविध प्रश्न विचारत उत्साहाने सहभाग घेतला. त्यांना व्यावहारिक उदाहरणांद्वारे कायदेशीर तरतुदी आणि सामाजिक जबाबदार्यांविषयी माहिती देण्यात आली. या शिबिरामुळे दापोली तालुक्यातील बालिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव झाली असून, समाजातील सशक्त आणि आत्मविश्वासपूर्ण स्त्री म्हणून पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.