loader
Breaking News
Breaking News
Foto

घर शिफ्टिंग केल्यानंतर कडी कोयंडा उचकटून चोरट्याने लांबविला साडे तीन लाखाचा मुद्देमाल

ठाणे (प्रतिनिधी) - नव्या घरात राहण्यास गेल्यानंतर जुन्या घराचा लावलेला कडी-कोयंडा अज्ञात चोरट्याने उचकटून घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह साडे तीन लाखाचा मुद्देमाल घेऊन पोबारा केल्याची तक्रार मल्लिका (४७) यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. श्रीनगर पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील किसननगर येथे राहणार्‍या मल्लिका यांनी आनंदनगर येथील उन्नती गार्डन येथे नवीन घर खरेदी केले. त्या नवीन घरी राहण्याकरिता गेल्या ७ दिवसांपासून सामान शिफ्टिंग काम सूरु आहे. १३ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जुन्या घराला लॉक लावून नवीन घरी गेल्या. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास जुन्या घराच्या शेजारी राहणार्‍या महिलेने फोन करून घराचे कुलूप तुटल्याचे सांगितले. घरी आल्यावर घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसून आला. तसेच त्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले त्यांचे आणि मुलीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले. यामध्ये एक लाख रोख, १० ग्रॅम वजनाचे ४० हजारांचे मंगळसूत्र, ०६ ग्रॅम वजनाचे २२ हजारांचे ब्रेसलेट, ०५ ग्रॅम वजनाची २० हजारांची चेन, ०६ ग्रॅम वजनाचे २२ हजारांच्या कानातील रींग, १५ ग्रॅम वजनाचे ६० हजारांचा नेकलेस, २० ग्रॅम वजनाच्या ८० हजारांच्या ४ बांगड्या, ०५ ग्रॅम वजनाच्या २० हजारांच्या ४ अंगठ्या असा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून अनोळखी चोरट्याविरोधात श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg