loader
Breaking News
Breaking News
Foto

ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन

शिरोडा - भारताचे माजी राष्ट्रपती कै.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे व जागतिक वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन एकनाथ गावडे व ग्रंथालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सदस्य तथा प्रसिद्ध साहित्यिक विनय वामन सौदागर यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रारंभी सचिन गावडे व विनय सौदागर यांनी अनुक्रमे कै.ए.पी.जे.अब्दुल कलाम व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून ग्रंथपाल प्राची पालयेकर व ग्रंथालयाची नियमित वाचक असलेली विद्यार्थिनी श्रीपल्ली लोखंडे यांच्या समवेत दीप प्रज्वलन केले. या पुस्तक प्रदर्शनास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच शिक्षक, वाचक, सभासद व ग्रंथालयाचे कर्मचारी उपस्थित होते. दि. ६ जून १९०६ रोजी स्थापन झालेल्या ११९ वर्षे जुन्या या ग्रंथालयातील सुमारे ४८ हजार पुस्तकांपैकी प्रदर्शनात मांडलेल्या महत्त्वाच्या निवडक पुस्तकांचे उद्घाटन कार्यक्रमानंतर उपस्थितांनी अवलोकन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg