रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या दुमजली इमारतीचे काम सुरू आहे. केवळ ९ महिन्यात ४००० चौ. फुटाच सुसज्ज बांधकाम पूर्णत्वाला गेल आणि प्रशस्त वाचन विभागाच उद्घाटन दीपक गद्रे, मायदेश फाउंडेशनचे अरुण जोशी डॉ.आलिमिया परकार, डॉ. श्रीरंग कद्रेकर, अभिजीत हेगशेटे यांचे सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. महाराष्ट्रातील सर्वात जुने ऐतिहासिक परंपरा असलेल्या या वाचनालयाचा समृद्ध वारसा नव्या युगासमोर सुसज्ज स्वरूपात यावा या साठी जीर्ण झालेल्या वास्तूला नवीन स्वरूपात उभारण्याच आमचं कर्तव्य होत ते चोख बजावता येतय याच समाधान लाख मोलाच आहे असे भावोद्गार वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी काढले. आपल्या अध्यक्षीय भाषणात लीज एग्रिमेंट साठी केलेला २४ वर्षाचा संघर्ष त्यात निग्रहाने अथक पाठपुराव्याने मिळालेल यश याची रंजक माहिती उपस्थितांसमोर ठेवली. रत्नागिरी नगर वाचनालय शासन चालवत नाही त्यासाठी पैसा उभा करावा लागतो मात्र समाजामध्ये गैरसमज आहे की वाचनालय पूर्णावशाने शासन चालवते. जुनी इमारत जीर्ण झाली होती केवळ कॉस्मेटिक ट्रिटमेंट ने ती चांगल्या स्थितीत दिसत होती त्यामुळे जीर्ण इमारतीला निरोप देणे आवश्यक होते असे आवर्जून नमूद करत आज पर्यंत प्रयत्नांची शिकस्त करत पैसा उभारला आणि विक्रमी वेगाने ही प्रशस्त वास्तू उभी राहते आहे असे पटवर्धन म्हणाले.
नव्या युगाचे नवीन वाचनालय उभे करायचे स्वप्न साकारण्या साठी आता मायदेश फाउंडेशन पुढे आले आहे. ऐतिहासिक संस्था संदर्भ जपण्या साठी नव्याने उभारण्यासाठी भरपूर साधनान चा उपयोग करण्याची क्षमता असलेले मायदेश फाउंडेशन आता वाचनालयाला अद्ययावत स्वरूपात प्रस्थापित करेल त्यासाठी वाचनालय पूर्ण सकारात्मकतेने मायदेश फाउंडेशन बरोबर कार्यरत राहील. असे सांगत या उभारणी मध्ये सहकार्य केलेल्या सर्वांचे पटवर्धन यांनी आभार मानले. या प्रसंगी मायदेश फाऊंडेशन चे मुख्यप्रवर्तक अरुण जोशी यांनी आपले विचार व्यक्त करत या ऐतिहासिक वाचनालयाला नवा साज देताना ऐतिहासिक संदर्भ अधिक प्रकाशाने समोर यावेत त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी अनेक प्रकल्प राबवण्याचा मानस अरुण जोशी यांनी व्यक्त करत मायदेश फाउंडेशन करत असलेल्या अन्य विकास कामांन बाबत माहिती दिली. या प्रसंगी अभिजित हेगशेटे यांनी या वाचनालयाचे महत्व सांगणारे अनेक किस्से सांगितले. चंद्रशेखर पटवर्धन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन झाले तसेच वाचनालयाच्या इमारतीसाठी भरीव निधी देणाऱ्या संस्था , बँका , व्यक्ती याना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये स्वरूपानंद पत संस्था, विजय देसाई, सौ अरुणा पटवर्धन, दिपक गद्रे, सौ प्रभुदेसाई मॅडम, श्रीमती सुखदा देव मॅडम, देवेंद्र जोशी, रत्नागिरी म्ध्य. सह बँक, मध्यवर्ती बँक कर्मचारी युनियन, सतीश कामत, संदीप कदम ,जयप्रकाश पाखरे, पितांबरी उदयोग, मायदेश फाउंडेशनचे अरुण जोशी डॉ. सुहास कुलकर्णी आदी मान्यवरांना शाल श्रीफळ पुष्पकरंडक देऊन दीपक पटवर्धन यांनी गौरवांकित केले. कंत्राटदार रूपेश साळवी, अंतर्गतसजावट करणारे श्री माजकर मव्हर्स अँड पॅकर्स श्री रसाळ यांनाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला शिरीष दामले, श्री बर्वे, माजी प्राचार्य डॉ. सुखटणकर, अँड. शबाना वस्ता, अँड. चंदगडकर, श्रीराम भावे , माधव गोगटे, सचिन करमरकर, उमेश कुलकर्णी डॉ. जवळीकर, राजन मलुष्टे अँड. सौ मयेकर यांचे सह मोठ्या संख्येने नागरिक बंधू भगिनी तसेच वाचनालयाचे व्य क समिती सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते. अत्यंत शानदार कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन आनंद पाटणकर यांनी केले. उपस्थितानी वाचनालयाचे नवे रूप आकर्षक असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.