loader
Breaking News
Breaking News
Foto

आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी करिअर कौन्सिलिंग कार्यक्रम

भोसले नॉलेज सिटी तर्फे आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शुक्रवार, दि.१७ ऑक्टोबर रोजी विशेष करिअर कौन्सिलिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात संपन्न होईल. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (निवृत्त) उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सध्या ते सैनिक स्कूलचे कमांडंट व भोसले नॉलेज सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या व्यापक लष्करी अनुभवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संरक्षण दलातील करिअरच्या संधी, प्रवेश प्रक्रिया आणि तयारीचे मार्गदर्शन मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक स्कूल प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये तसेच भविष्यातील करिअर संधींबाबत सविस्तर माहिती देणे आहे. शिस्त, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सैनिकी संस्कार यांचा संगम असलेले सैनिक स्कूल हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी ठरते. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून त्यांचे करिअर घडविण्यास मदत होईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी ७८७५१४९७१७ किंवा ७४४८१८७१८९ या क्रमांकावर नावनोंदणी करावी, असे आवाहन भोसले नॉलेज सिटी तर्फे करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg