loader
Breaking News
Breaking News
Foto

एल.टी. टी.स्कूलमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा रंगला बहारदार कलाविष्कार!

खेड : तालुक्यातील नामांकित लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल.टी.टी.इंग्लिश मिडिअम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, खेड या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक अंध सहाय्यता दिनाचे औचित्य साधून ‘दिव्यांग विद्यार्थी कलाविष्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सानप, तसेच स्नेहज्योती अंध विद्यालय, घराडीच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता, उत्तमकुमार जैन, अनुग्रह विशेष शाळा वेरळचे संस्थाचालक फादर शहाजी, मुख्याध्यापिका रोज बेल, दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, समन्वयक सेबास्टियन जॉय, समन्वयक सौ.एल सी जॉय, प्राचार्य जी.बी.सारंग, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एस.कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व उपस्थितांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच दिव्यांग कलाकारांचेही स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी स्नेहज्योती अंध विद्यालय, घराडी-मंडणगडच्या विद्यार्थी व शिक्षकांनी विविध वाद्ये स्वतः वाजवत आपल्या गोड व सुमधुर गायनाने तसेच अनुग्रह विशेष शाळा, वेरळ-खेड या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. तेव्हा कार्यक्रमादरम्यानचे वातावरण संगीतमय झाले होते. उपस्थितांनीही त्यांच्या या कलागुणांना मनमुराद दाद देत भरभरून कौतुक केले. प्रबळ इच्छाशक्ती व चिकाटीच्या जोरावर दिव्यांगावर मात करून आपण यशाचे शिखर गाठू शकतो व आपले जीवन सुंदर बनवू शकतो ही प्रेरणा सर्व उपस्थितांना या विद्यार्थी कलाकारांकडून मिळाली. संस्थाध्यक्ष अहमद मुकादम यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ.आर.आर.जाधव, सौ.सुजाता शिगवण व आफरीन कौचाली यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg