loader
Breaking News
Breaking News
Foto

गर्दीच्या लोकलमधून उतरताना विद्यार्थ्यांचा मोबाईल गेला चोरीला

ठाणे (प्रतिनिधी) - मुंबई वरून लोकलने मुलुंडकडे निघालेल्या इंजिनियरचा विद्यार्थी मुलुंडला उतरण्यास न मिळाल्याने ठाण्यात आल्यानंतर त्याच्या खिशातील ६१ हजाराचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्याने लोकलमधून ठाण्यात उतरताना लांबविल्याचा प्रकार घडल्याची तक्रार ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारदार विद्यार्थ्याने तक्रार नोंदविली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुलुंड येथे राहणारा विद्यार्थी हा १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ब्रांदा येथील कॉलेजला नेहमीप्रमाणे गेला होता. कॉलेज सुटल्यावर तो काही खासगी कामानिमित्त मस्जिद बंदर येथे गेला होता. काम झाल्याने परत मुलुंड येथे येण्याकरिता मस्जिद बंदर येथून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ धीम्या लोकलमध्ये चढला. सीटवर बसून प्रवास सुरु झाल्यावर मुलुंड येथे उतरायचं असल्याने नाहूर रेल्वे स्थानक गेल्यानंतर मोबाईल फोन पॅन्टच्या खिश्यात ठेवून उभा राहिला. मात्र प्रवाशांची गर्दी वाढल्याने मुलुंड रेल्वे स्थानकात उतरता आले नाही.

टाईम्स स्पेशल

त्यामुळे त्या लोकलने सात वाजून ४० मिनिटांनी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वर प्रवाशांच्या गर्दीत उतरून मोबाईल पाहिल्यावर तो मिळून आला नाही. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यामध्ये प्रवाशांच्या गर्दीत नाहूर ते ठाणे रेल्वे प्रवासात मोबाईल फोन चोरीला गेला असून त्याची किंमत ६१ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg