loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर वैभव खेडेकर भाजपात दाखल

खेड - मनसे पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर वैभव खेडेकर यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार हे निश्चित झाले होते. या पक्षप्रवेशसाठी वैभव खेडेकर हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत देखील दाखल झाले होते. मात्र एकदा नव्हे तब्बल दोनदा त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. यामुळे थोडासा संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. अखेर वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशावर पडदा पडला असून वैभव खेडेकर यांनी आज मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी भाजपा पक्षात मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा फायदा भाजपला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याची शक्यता शहरवासी मधून वर्तवली जात असून वैभव खेडेकर यांच्या पुढील राजकीय रणनीतीकडे व भाजपकडून त्यांना कोणत्या पदाची संधी मिळते याकडे मात्र खेड वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg