कणकवली (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक असलेली जुनी नावे बदलून महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांची निगडित असलेली नावे देऊन, महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे शहरी आणि ग्रामीण भागात हरिजनवाडी, जाधववाडी, चर्मकारवाडी, बौद्धवाडी अशा जातिवाचक नावांनी कोणतेच रस्ते आणि वाड्यांचा उल्लेख होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा फार मोठा निर्णय असून पालकमंत्री नितेश राणे यांनी जनता दरबार मध्ये अनुसूचित जातीच्या शिष्ट मंडळाला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. हा निर्णय जिल्ह्याच्या सामाजिक ऐक्याला बळकटी देणारा ठरणार आहे.
जुलै महिन्यात अनुसूचित जातीसाठी आयोजित करण्यात आलेल्या समाज संवाद आणि तक्रार निवारण जनता दरबारात पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे सामूहिक मागणी प्रलंबित असल्याची बाब निर्दशनास आणून देण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री नेते शरण्ये यांनी हे काम युद्धपातळीवर प्रशासनाने करावे अशाही सूचना दिल्या होत्या आणि त्याचा सातत्याच्या बैठकांमध्ये आढावाही घेतला होता. ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून अशा जातीवाचक नावाऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आदेश निर्गमित केला आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 192 जातीवाचक वस्त्यांची व 25 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याबाबतचा शासन निर्णय जातिवाचक वाढीवस्त्यांची नावे बदलणे या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे.
ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपद्धती शासन निर्णयान्वय निश्चित केली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 192 जातीवाचक वस्त्यांची व 25 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याकरता ग्रामसभेचा ठराव पास करून त्याबाबतचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले होते. सदर प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आलेले होते. शासन निर्णयान्वये जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 192 वस्त्यांची व 25 रस्त्यांची जुनी जातीवाचक नावे बदलून ग्रामसभा ठरावत प्रस्तावित केलेली नावे शासन निर्णयानुसार प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे प्राप्त अहवालानुसार या आदेशाद्वारे जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यात आली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.