loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वांकष विदयामंदीर च्या सई जाधव ने २० रँक मिळविण्याचा मान पटकाविला

रत्नगिरी- सर्वांकष विदयामंदीर रत्नागिरी शाळेची कुमारी सई नितीन जाधव सीबीएससी ने दिल्ली पब्लिक स्कूल, रुद्रापूर, उत्तराखंड येथे दिनांक ३०/०९/२०२५ ते दिनांक ०५/१०/२०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या सीबीएससी नॅशनल फेन्सिंग चँम्पियनशिप २०२५-२६ (राष्ट्रीय स्तरीय तलवारबाजी स्पर्धा २०२५) मध्ये संपूर्ण भारतामधून १४ वर्षे वयोगटाखालील मुलींमध्ये २० वी रँक मिळविली असून शाळेमधून तिचे कौतूक करण्यात येत आहे. सदर स्पर्धेकरीता सर्वांकष विदयामंदीर रत्नागिरी शाळेमधील मुख्याध्यापिका तसेच स्पोर्टस टिचर कमल फेन्सिंग (तलवारबाजी) खेळाचे कोच निखिल कदम यांनी सई जाधव हिला खूपच सहकार्य केले आहे. सीबीएससी ने आयोजित केलेल्या नॅशनल फेन्सिंग चँम्पियनशिप २०२५ या स्पर्धेकरीता संपूर्ण भारतातील सर्व राज्यांमधील सीबीएससी च्या सर्व शाळांमधून मुलांनी सहभाग घेतला होता. तरी रत्नागिरी जिल्हयामधून सई नितीन जाधव हीने सदर स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटाखालील मुलींमध्ये पहील्या ६ मॅचमध्ये ३ मॅच जिंकून नॉकआऊट राऊंडमध्ये प्रवेश केला. सदर स्पर्धेमध्ये तीने १४ वर्षे वयोगटाखालील मुलींमध्ये संपूर्ण भारतात २० रँक मिळविण्याचा मान पटकाविला आहे. सर्वांकडून तिचे कौतूक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg