ठाणे (प्रतिनिधी) मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरात अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट निर्माण झाल्याच्या तक्रारी वाढत असताना.ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्राॅन (एमडी) या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या इरफान नुरमोहम्मद शेख (४७) आणि मोहम्मद इरफान हानीफ शेख (२५) या दोघांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक केली. त्यांच्याकडून ४४ लाखाहून अधिक रुपयांचा एमडी या अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आले आहे. या अमली पदार्थांची तस्करी प्रकरणी अल्पवयीन मुले देखील अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिले होते.
त्यानुसार, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. साहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी विशेष मोहीम राबविली होती.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर-पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र कदम, दिपक हु्म्मलवाड, पोलीस हवालदार शिवाजी रावते, संदीप चव्हाण, हरीष तावडे, अभिजीत मोरे, अमोल पवार, अमोल देसाई, हुसेन तडवी, अजय सपकाळ, अमित सपकाळ, नंदकिशोर सोनगिरे, गिरीश पाटील, शिल्पा कसबे, पोलीस शिपाई आबाजी चव्हाण, पोलीस नाईक अनुप राक्षे, कोमल लादे यांनी केली.
३ ऑक्टोबरला रोजी अमली पदार्थांची तस्करीची पहिली कारवाई शिळफाटा येथे झाली. शिळफाटा येथे एकजण अमली पदार्थ घेऊन येत असल्याची माहिती पोलीस हवालदार संदीप चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून मोहम्मद इरफान हानिफ शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४ लाख २ हजार रुपये किमतीचा २०.१ ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ आढळून आला.ठाण्यात कळवा नाका येथे दुसरी कारवाई झाली.पोलीस हवालदार गिरीश पाटील यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलीस पथकाने सापळा रचून इरफान शेख याला ११ ऑक्टोबरला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याच्याकडून ४० लाख ६४ हजार रुपये किमतीचा २०३ ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी इरफानला अटक केली होती.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.