loader
Breaking News
Breaking News
Foto

वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण; बस स्थानक ते जेलरोडपर्यंत रोजचा संघर्ष

रत्नागिरी (जमीर खलफे) - आधीच वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेल्या रत्नागिरीतील वाहनचालकांना आता शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. रत्नागिरी बस स्थानक ते जेलरोड या प्रमुख रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच समस्या बनली असून, यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा बस स्थानक ते जेलरोड हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, शहराच्या अनेक मुख्य भागात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. सध्या रत्नागिरी शहरात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. घामाघूम झालेले वाहनचालक कसेबसे प्रवास करत असतानाच, त्यांना या ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. विशेषतः दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना या कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा सिग्नलवर थांबून राहिल्याने गाडीचे इंजिन गरम होणे, जास्त इंधन खर्च होणे आणि प्रचंड मानसिक ताण येणे, या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वाहतूक कोंडीमागे अनेक कारणे आहेत. रस्त्यांची अपुरी रुंदी, बेशिस्त पार्किंग, रस्त्याकडेला झालेले अनधिकृत अतिक्रमण आणि वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या ही प्रमुख कारणे आहेत. बस स्थानक परिसरात बस आणि अन्य वाहनांची गर्दी, तर जेलरोडकडे जाणारा अरुंद रस्ता, यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि कोंडी होते. नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही यावर कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. ’बस स्थानक ते जेलरोड’ या पट्‌ट्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, तसेच काही ठिकाणी एकेरी वाहतुकीचा विचार करून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत. अन्यथा, येत्या काळात ही समस्या आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg