loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलचे यश

मालवण : (प्रतिनिधी) - ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १४ वर्ष मुली गटात मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडिअम स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले. या संघाची कोल्हापूर विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली असून हा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघात सोनाक्षी शेलटकर, हिमांगी मलिक, रिया मेस्त, रिया शेलटकर, यशिका चव्हाण, जीविका तोडणकर, सुजाता कदम, शमिका पाटील, प्रतिभा परुळेकर, निधी फाटक, गौतमी गावकर, काव्या शेलटकर, या विद्यार्थिनींचा सहभाग होता. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक निशाकांत पराडकर, पंकज राणे, कबड्डी प्रशिक्षक नितीन हडकर, दीपक जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या विजेत्या संघाचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका वेंगुर्लेकर, सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg