loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत गोवा बनावटीची दारू आणि XUV 500 कारसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

​सावंतवाडी (प्रतिनिधी): ​स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दि. १२ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई केली आहे. आंबोली ते सावंतवाडी रोडवर सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये गोवा बनावटीची दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली XUV 500 कार असा एकूण ११,६७,४०० रूपये (अकरा लाख सदुसष्ठ हजार चारशे रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासणीत गोवा बनावटीची दारू आढळून आली. जप्त केलेल्या मुद्देमालात १,६७,४०० रूपये (एक लाख सदुसष्ठ हजार चारशे रुपये) किंमतीची गोवा बनावटीची दारू आणि १०,००,००० रूपये (दहा लाख रुपये) किंमतीची XUV 500 कार (एमएच १२ एनजी ६४४३) समाविष्ट आहे. ​या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टाईम्स स्पेशल

दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे : अजित सुखदेव जगताप, रा. मोहोळ पुंडलिक नामदेव बाबर, रा. पंढरपूर ​सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि महेश्वर समजिसकर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास सावंतवाडी पोलीस ठाणे करत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg