loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संगमेश्वर-कसबा येथे रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे मानवंदना

कसबा - महाराष्ट्र शासन तसेच स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती कसबा यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर संभाजी महाराज यांची ६६९ वी जयंती कसबा ता.संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे साजरी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी, दि. 14 (जिमाका) : ३६९ व्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संगमेश्वर-कसबा येथील महाराजांच्या स्मारकास रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे शासकीय मानवंदना देण्यात आली. पोलीस दलातर्फे अशा प्रकारे मानवंदना देण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे कसबा याठिकाणी पार पडलेल्या या सोहळ्यात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पोलीस बँड पथकाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना दिली.त्या अनुषंगाने १३ मे पासून येथे स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून १३ व १४ मे या दोन दिवसीय महोत्सवात मुद्रा भिंती चित्रे स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,किल्लेस्पर्धा रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांना स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून व मान्यवरांकडून धर्मवीर संभाजी राजेंना मानवंदना देण्यात आली.जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वराज्य महोत्सव साजरा होत असून शिवप्रेमींची अलोट गर्दी येथे होत आहे.

टाइम्स स्पेशल

छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली हे माझे भाग्य आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव आसलेल्या जिह्यातून, शहरातून मी येतो, याचा मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपले स्वाभिमान आहेत - पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg