loader
Breaking News
Breaking News
Foto

सैतवडे गावचे सुपुत्र डॉ. अदनान चिलवान यांची 'फोर्ब्स मिडल इस्ट'च्या १०० सर्वोत्कृष्ट सी.ई.ओ. मध्ये गरुडझेप!

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे (जि. रत्नागिरी) या गावाचे नाव जागतिक स्तरावर अभिमानाने झळकावणारे भूमीपुत्र, डॉ. अदनान अब्दुल शकुर चिलवान यांनी पुन्हा एकदा एक दैदीप्यमान यश संपादन केले आहे. 'फोर्ब्स मिडल इस्ट' यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या 'टॉप १०० सी.ई.ओ.' च्या प्रतिष्ठित यादीत डॉ. चिलवान यांना ३६ वे स्थान प्राप्त झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुबई इस्लामिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ) म्हणून कार्यरत असलेले डॉ. अदनान चिलवान हे सैतवडे गावातील गुबंद मोहल्ला येथील दिवंगत अब्दुल शकुर चिलवान यांचे चिरंजीव आहेत. आपल्या अफाट बुद्धिमत्ता, प्रचंड मेहनत आणि अविश्रांत चिकाटीच्या बळावर त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी एका जागतिक स्तरावरील अत्यंत दर्जेदार आणि यशस्वी सी.ई.ओ. म्हणून आपला लौकिक कायम राखला आहे. ​त्यांच्या या गौरवशाली कामगिरीमुळे केवळ सैतवडे गावच नव्हे, तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. एका छोट्या गावातील मुलाने आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी मोठी ओळख निर्माण करणे, हे प्रत्येक भारतीयांसाठी नक्कीच एक प्रेरणास्रोत आणि गर्वाची बाब आहे.

टाइम्स स्पेशल

डॉ. अदनान चिलवान यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे. दी . मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे आणि मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संस्थेनेही या गौरवशाली निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ​डॉ. अदनान चिलवान यांनी मिळवलेले हे स्थान त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg