loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण नगरपालिका प्रभाग ८ मधील शिवसेना प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वर्षभरात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केलेले नियोजन व मी आमदार या नात्याने केलेले काम या जीवावर आम्ही नगरपालिका निवडणुकीसाठी मते मागत असून येथील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदासह सर्व वीसही उमेदवार निवडून येतील. विकास हा केंद्र बिंदू ठेऊन आम्ही ही निवडणूक लढवत असून पालिकेत आपली सत्ता आल्यावर शहरातील नागरिकांना आपण काय देणार आहोत, त्याचा परिपूर्ण आराखडा घेऊनच आम्ही जनतेकडे मते मागणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मालवण शहरातील शिवसेनेचे प्रभाग ८ चे उमेदवार राजन परुळेकर व शर्वरी पाटकर यांच्या गवंडीवाडा येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण नगरपालिका निवडणूक रिंगणातील शिवसेनेचे प्रभाग ८ मधील उमेदवार राजन परुळेकर व शर्वरी पाटकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाट्न आमदार निलेश राणे यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. आमदार राणे पुढे म्हणाले, आम्ही विकासावर ही निवडणूक लढवतोय आणि जर ही निवडणूक भरकटली गेली तर जनतेला कळलं पाहिजे कोणामुळे भरकटते आहे. मालवण शहरासाठी आपल्याला काय द्यायचंय त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन आम्ही शहरासमोर ठेवणार आहोत. त्याच्यावर मते मागणार आहोत. आपण येथील नागरिकांना काय देतोय, हे जोपर्यंत शहराला दाखवत नाही, तोपर्यंत आपल्याला मतदान मागायचा अधिकार नाही. आमचा पक्ष जसा डेव्हलपमेंट प्लॅन दाखवतोय तसं प्रत्येक पक्षांनी दाखवला पाहिजे. मीच शहाणा आहे असे म्हणण्याचा माझा भाग नाही. तुमचा शहराबद्दलचा प्लॅन काय ? घनकचरा असेल, ओला कचरा सुका कचरा दरवाजापर्यंत येऊन गाडी नगरपालिकेची घेऊन जाणार याचं नियोजन आम्ही या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये केले आहे. कचरा मुक्त मालवण साठी दोन कोटीचा निधी नगरपालिकेमध्ये आलेला आहे. उर्वरित जो निधी लागणार आहे तो प्रस्तावित आहे. एकही कचर्‍याचा कण या मालवणमध्ये दिसता कामा नये हा आमचा प्रयत्न आहे. कुठेही पडलेली प्लास्टिकची बॉटल दिसता कामा नये, असे ते म्हणाले. यावेळी दत्ता सामंत म्हणाले, आपल्याकडे चारित्र्य संपन्न उमेदवार आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवार दिला आहे, तो काही दिवसांपूर्वी एक मराठा, लाख मराठा करत मराठा मोर्चात सहभागी होत होता. निवडणुकीत ओबीसी आरक्षण पडल्यानंतर ते ओबीसी झाले. सुरुवाती पासूनच कस खोटं करायचं, त्याची प्रक्रिया त्यांनी सुरु केली आहे. उद्या नगरपालिकेत गेल्यानंतर ही माणसे कसे ढोल बढवतील हे तुम्हाला पण कळणार नाही. आमची नगराध्यक्ष पदाची उमेदवार सुसंस्कृत, संस्कारक्षम, आदर्श, शहराला कुटुंब म्हणून समजणारी, कुठलाही भ्रष्टाचार न करणारी लक्ष्मी नगरपालिकेला आम्ही देणार आहोत. पण समोरचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, ते राजकोट पुतळ्या वेळी जी शिवराळ भाषा वापरत होते, ते सर्वांनी पाहिले आहे. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगतो, त्याच्या तोंडी कधीही शिवराळ भाषा येणार नाही. याचा सुज्ञ मतदारांनी विचार केला पाहिजे. निलेश राणे मागील एक वर्षात ज्या पद्धतीने विधिमंडळात आमदार म्हणून काम करत आहेत, आपला मतदार संघ टॉप १० मध्ये नेण्याचं काम करत आहेत.

टाइम्स स्पेशल

नारायण राणे यांनी हा मतदार संघ वेगळया उंचीवर नेऊन ठेवला होता, त्याला २०१४ नंतर ब्रेक लागला. त्याला पुन्हा सातत्य ठेवून कळस चढवण्याचं काम निलेश राणे करत आहेत. कितीही लोकांनी त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तरी येथील जनता सुज्ञ आहे. निलेश राणे दिवसरात्र एक करून जे काम करत आहेत, ते पाहता नगराध्यक्ष उमेदवारा सह आपला एक ही नगरसेवक पदाचा उमेदवार पडणार नाही, आमचे सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी ममता वराडकर यानी नगराध्यक्ष पदाला न्याय देण्याची ग्वाही देत तुमच्या आशीर्वादाने निवडून आल्यावर आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शहरातील विकासकामे पूर्ण करणार असल्याचे सांगितले. यावेळी बबन शिंदे यांनीही विचार मांडले. यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, युवक जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख दीपक पाटकर, सौ. संध्या परुळेकर, आनंद शिरवलकर, निषय पालेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg