loader
Breaking News
Breaking News
Foto

'किंग मेकर' आमदार दीपक केसरकर सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या मैदानात

सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ एकहाती निवडणुका जिंकण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले, आणि चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. निवडणुका कशा जिंकायच्या, कोणता मुद्दा प्रचारात केव्हा आणि कसा वापरायचा यात त्यांचा हातखंडा आहे. एकेकाळी 'किंग मेकर' म्हणून ओळखले जाणारे आमदार केसरकर यांची तब्येत पूर्णपणे बरी नसतानाही त्यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

'आधुनिक शिल्पकार' म्हणून ओळख: आमदार दीपक केसरकर यांनी नगराध्यक्ष म्हणून सलग ९ वर्षे सावंतवाडी शहराचे नेतृत्व केले आणि शहराचा सर्वांगीण विकास केला. त्यामुळे त्यांची ओळख सावंतवाडी शहराचे 'आधुनिक शिल्पकार' अशी झाली आहे. त्यांचे वडीलही शहरात 'नगरसेठ' म्हणून प्रतिष्ठित होते. त्यांनी रोटरी क्लबपासून सामाजिक कार्यात सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी निवडणुकांमध्ये एकहाती विजय मिळवण्यास सुरुवात केली. नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये त्यांच्या अचूक नियोजनामुळेच यश मिळत गेले. ​पूर्वीच्या काळात ते पोस्ट कार्डद्वारे मतदारांना साद घालत, आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे मतदारांचा त्यांच्या पत्रावर विश्वास असायचा.

टाइम्स स्पेशल

​ते स्वतः तासनतास बसून प्रचार पत्रके तयार करतात, जी लोकांचे मन वळवणारी असतात. ​सामान्य लोकांपासून श्रीमंतांपर्यंत त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. भेटीदरम्यान झालेल्या चर्चांमधून त्यांना निवडणुकीचे वातावरण आणि लोकांचे मनोगत अचूक समजते. ​ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ते लोकांना पटतील असे, आणि वातावरण ढवळून काढणारे मुद्दे मांडतात. त्यांच्या 'केव्हा काय बोलतील' याचा अंदाज प्रतिस्पर्धकांनाही येत नाही. ​सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर आणि 'मैत्रीपूर्ण लढत' म्हणून लढवली जात आहे. या दरम्यान मित्रपक्ष किंवा विरोधकांनी टोकाची भूमिका घेतली किंवा टीका केली, तर आमदार केसरकर त्याला रोखठोक उत्तर देतील, असा विश्वास त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी व्यक्त केला आहे. ​आमदार दीपक केसरकर आणि त्यांच्या कुटुंबाचे सामाजिक कार्यात भावनिक आणि आर्थिक योगदान मोठे आहे, ज्यामुळे त्यांची ओळख सावंतवाडीतील प्रतिष्ठित कुटुंब म्हणून आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg