loader
Breaking News
Breaking News
Foto

वेर्ले गावातील शेकडो नागरिकांचा ’दीपक केसरकर’ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी (प्रतिनिधी) - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांगीण विकासाचे काम सुरू केले आहे. त्यावर विश्वास ठेवून वेर्ले गावातील नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला, तुम्ही या ठिकाणी सुरक्षित आहात. आता सर्वांगीण विकासाचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावातील शेकडो ग्रामस्थ, विविध पक्षांचे पदाधिकारी, युवा वर्ग आणि महिलावर्ग यांनी आपले नेते हे फक्त ’दीपक केसरकरच’ असे सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पक्षप्रवेश केलेल्या तमाम ग्रामस्थ व पदाधिकार्‍यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी बोलताना आ. केसरकर म्हणाले, वेर्ले गावासाठी आजपर्यंत ज्या काही मागण्या झाल्या त्या अधिकाधिक पूर्ण केलेल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आगामी काळातही गावात हायमास्ट, तसेच रस्त्याची कामे व इतर रखडलेली कामे देखील पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत केले. तसेच, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून वेर्ले पंचक्रोशीच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी व प्रशासनाच्या दरबारी पाठपुरावा करत गावासाठी १०० टक्के सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आपण सर्वांनी आमदार केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख दिनेश गावडे, सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, गजानन नाटेकर, प्रमुख गावकर सोमनाथ राऊळ, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक देसाई, युवा नेते सूरज परब, उपतालुकाप्रमुख राकेश पवार यांसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व गावातील ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

शिवसेनेत युवा नेतृत्व वेर्ले ग्रामपंचायत सदस्य सूरज राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण गावडे, वेर्ले विवीध विकास सेवा संस्था अध्यक्ष माजी सरपंच विजय राऊळ, माजी सरपंच, माजी देवस्थान उपसमीती उपाध्यक्ष, काँग्रेसचे चद्रकांत राणे, माजी सरपंच यशवंत राऊळ, माजी सरपंच पंढरी राऊळ, माजी उपसरपंच शशिकांत घाडी, सोसायटी संचालक अनील लिंगवत, महेश राऊळ, संजय राऊळ, प्रमुख गावकार सोमनाथ राऊळ, अस्मिता राणे, सुनील मर्गज, रामा राणे, अर्जुन मोरजकर, बाळकृष्ण राऊळ, आदित्य राऊळ, तुकाराम राऊळ, विश्राम लिंगवत, पाडुरंग राऊळ, गुणाजी राऊळ, शांताराम राऊळ (टेमकर), सत्यवान राऊळ, अशोक राऊळ, बुधाजी घोगळे, पीडजी राऊळ, संतोष लिंगवत, सुनील राऊळ, रामकृष्ण राऊळ यांच्यासहित शेकडो नागरिकांचे स्वागत आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रमुख गावकर सोमनाथ रामचंद्र राऊळ, बाबी राऊळ, बाळू गावडे आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg