loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटी च्या वतीने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दूरदर्शन संच भेट

खेड (दिलीप देवळेकर) - नवभारत हायस्कूल भरणे येथील र.बा. जाधव विद्यार्थी वस्तीगृहसाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या मातोश्री कै. रूपाली भास्कर विचारे यांच्या स्मरणार्थ दूरदर्शन संचाची भेट देण्यात आले. याप्रसंगी रोहन विचारे यांनी आपल्या मनोगतात आजचा हा आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. कारण वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदर्शन संचाची भेट देऊन दूरदर्शन संच देण्याचा हेतू स्पष्ट केला. वस्तीगृहातील विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी घरापासून दूर राहून मेहनत घेत असतात. त्यांच्या दैनंदिन जीवनात थोडासा आनंद, ज्ञान आणि प्रेरणा मिळावी, यासाठी दूरदर्शन संच ही अत्यंत मोलाची भेट आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजच्या युगात टीव्ही हा केवळ मनोरंजनाचा साधन नाही, तर ज्ञानाचा, माहितीचा आणि प्रेरणेचे महत्त्वाचे माध्यम आहे. शैक्षणिक कार्यक्रम, विज्ञानविषयक माहिती, स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन, सभोवतालच्या जगातील घडामोडी हे सर्व विद्यार्थ्यांना या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची गोडी आणि उत्साह वाढवण्यासाठी ही भेट नक्कीच उपयुक्त ठरेल. असे त्यांनी सांगितले. वस्तीगृह चे गोरिवले यांनी या भेटीमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक जग व्यापक होईल, त्यांचे व्यक्तिमत्त्व घडेल आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. वस्तीगृहातील जे विद्यार्थी घरापासून दूर असतात त्यांच्यासाठी हा टी.व्ही.म्हणजे केवळ उपकरण नव्हे.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रम प्रसंगी नवभारत हायस्कूलचे प्राचार्य बोधे, स्कूल कमिटी अध्यक्ष चाळके, लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चे माजी अध्यक्ष रोहन विचारे, सचिव ओम जाधव कोषाध्यक्ष ला. माणिक लोहार, ला. उत्तम कांबळे, वस्तीगगृहाचे अधीक्षक हटकर मॅडम उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg