loader
Breaking News
Breaking News
Foto

निगडे येथील मुद्रा वॉटर पार्कचे उद्घाटन

दापोली (यशवंत कांबळे) - निगडे, दापोली येथे नव्याने सुरू झालेल्या मुद्रा वॉटर पार्कचे उद्घाटन आज नामदार योगेशदादा कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून दापोली तालुका उदयास येत आहे. रोजगार निर्मितीसाठी उद्योगांचे उभे राहणे गरजेचे असल्याने मुद्रा वॉटर पार्कच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना दिल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच अशा पर्यटनातूनच दापोलीत रोजगार निर्माण होतील असा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरभाई देसाई, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, दापोली नगराध्यक्ष कृपाताई घाग, ह.भ.प.श्री.रेवाळे महाराज, माजी सभापती पंचायत समिती दापोली चंद्रकांत बैकर, को.कृ विद्यापीठ सिनेट सदस्य सुनिल दळवी, महिला उपजिल्हा संघटिका रोहीणीताई दळवी, माजी समाजकल्याण सभापती चारुताताई कामतेकर, तालुका महिला संघटिका दित्पीताई निखार्गे, दापोली शहरप्रमुख पप्पु रेळेकर, मधुकर रेवाळे, सचिन म्हाब्दी, दापोली तालुक्यातील सर्व पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच निगडे गावचे ग्रामस्थ बंधू-भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg