loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी सावंतवाडी पोलिसांनी शहरात रूट मार्चचे आयोजन केले होते. ​हा रूट मार्च पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. ​रूट मार्चची सुरुवात जगन्नाथराव भोसले उद्यान येथून झाली आणि त्यानंतर तो आरपीडी स्कूल, मँगो हॉटेल, जयप्रकाश चौक, गांधी चौक, राऊत परब दुकान नाका या मार्गावरून पुन्हा नगरपालिका रोड मार्गे जगन्नाथराव भोसले उद्यान येथे परत आला. ​या रूट मार्चमध्ये सावंतवाडी पोलिस ठाण्याचे चार अधिकारी आणि १५ अंमलदार यांचा समावेश होता. यासोबतच दंगल नियंत्रण पथकाचे ४३ अंमलदार आणि पाच होमगार्ड्स देखील सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखणे आणि जनतेला आश्वस्त करणे, जेणेकरून मतदान निर्भयपणे पार पडेल. ​पोलिसांनी केलेल्या या संचलनामुळे निवडणुकीच्या काळात शांतता राखण्याचा संदेश देण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg