मालवण (प्रतिनिधी) - नैसगिक युतीसाठी भाजप व शिवसेना हे सोबत असणे आवश्यक आहे, यासाठी आम. निलेश राणे मार्गक्रमण करत होते. खास. नारायण राणे यांच्यानंतर जिल्हा सांभाळण्याची ताकद आम. निलेश राणे यांच्यात आहे. त्यामुळे आम. निलेश राणे यांचा काहींनी धसका घेतला आहे. याकडे आम. निलेश राणे यांनी लक्ष देऊ नये, सर्वांनी धनुष्यबाणावरच लक्ष द्यावे, मालवण नगरपालिका निवडणुकीत विजयाचा सिक्सर आम. निलेश राणेच मारतील आणि मालवण नगरपालिकेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष व सर्व २० नगरसेवक निवडणुकीत येतील, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मालवण येथील सभेत बोलताना केला. मालवण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मालवण येथील शिवसेना कार्यालय येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रचार सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आम. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संपर्कप्रमुख मोरे, संजय पडते, महेश कांदळगावकर, काका कुडाळकर, उमेश नेरुरकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी मालवण मधील युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी ना. उदय सामंत म्हणाले, नगरपालिका निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजप - शिवसेना युती व्हावी यासाठी आमदार निलेश राणे यांची तळमळ होती. जेव्हा काहींनी स्व:बळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी अर्ज भरले गेले तेव्हा मी आणि आम. निलेश राणे यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन काय करायचे हे विचारले. तेव्हा नारायण राणे यांनी हतबल होऊन "तुम्ही पुढे चला, मी तुमच्या सोबत आहे, माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे " असे सांगितले. ज्या नारायण राणे यांना मालवणने मुख्यमंत्री बनवले त्यांचेच चिरंजीव आज धनुष्यबाण निशाणीवर आपले उमेदवार लढवत आहेत. मात्र काहींकडून आम. निलेश राणे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. खास. नारायण राणे यांना त्रास होईल असे काहीही करायचे नाही अशी भूमिका आम्ही घेतली. मात्र राणेंचेही दुर्दैव आणि आमचेही दुर्दैव असे की युती झाली नाही. येथील जनतेने नारायण राणे यांच्याकडे बघून निलेश राणे यांच्या पदरात विजय टाकावा, आज येथे कार्यकर्त्यांचे हसरे चेहरे पाहून निकालात विरोधक शून्य असतील असेही, उदय सामंत म्हणाले.
यावेळी ना. उदय सामंत पुढे म्हणाले, आम. निलेश राणे यांनी सांगितल्याप्रमाणे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने मराठा असूनही ओबीसी सर्टिफिकेट घेतले ही मराठा आणि ओबीसी समाजाचीही फसवणूक आहे. याची नोंद मालवणच्या जनेतेने घेतली पाहिजे. खरंतर ताठ मानेन निवडणुकीला उभं रहायचं, मात्र आपण ज्या जातीत जन्माला आलो ती जातच बदलायची आणि दोन्हीही जातीचा अपमान करायचा असा प्रकार राज्यात कुठे प्रथम घडला असेल तर तो मालवणात घडला आहे. निलेश राणे यांनी पूर्ण माहिती दिलेली नाही, ते थोडं थोडं सांगतात पण जे सांगतात ते ठासून सांगतात, आणि पूर्ण सांगतात तेव्हा काहींची पळता भुई थोडी होते. खेळवून खेळवून शेवटच्या बॉलवर सिक्स मारतात, मालवण नगरपालिका विजयाचा सिक्सर देखील निलेश राणेच मारतील, असेही ना. सामंत म्हणाले. आज सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनामय झाला आहे, यामागे आम. निलेश राणे यांची मेहनत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आम. निलेश राणे यांच्यावर विशेष प्रेम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम. राणे यांच्या नेहमी पाठीशी राहून मालवण साठी विकास निधी देत राहतील. खास. नारायण राणे यांच्या स्वप्नातील मालवण शहर साकरण्यासाठी आम. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच मालवण नगरपालिकेवर आली पाहिजे, विजयी मेळाव्याला मी येईन, असेही ना. उदय सामंत म्हणाले.




















































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.