loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे समर्थनगर येथे घरफोडी

खेड (वार्ताहर) : - तालुक्यातील भरणे समर्थनगर परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना घडली आहे. या घरफोडीत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या २२ वर्षीय साक्षी सचिन जाधव यांची १० हजाराची रोख रक्कम चोरीला गेली आहे. ही घटना २६ रोजी पहाटे ३ ३० वाजण्याच्या दरम्यान घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने फिर्यादी राहत असलेल्या दिवेकर चाळ येथील खोलीच्या दर्शनी स्लायडिंग खिडकीजवळील सेफ्टी लोखंडी ग्रीलचे उजव्या बाजूकडील खिळे कोणत्यातरी धारदार हत्याराने उचकटून काढले. त्यानंतर खिडकीतून आत प्रवेश करत चोरट्याने घरातील नंबर २ रूममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडून त्यात ठेवलेली चॉकलेटी रंगाच्या पर्समधील १० हजाराची रोख रक्कम लंपास केली. यानंतर चोरट्याने खोलीचे आतून बंद असलेली दर्शनी दरवाजाची कडी उघडून चोरट्याने पळ काढल्याचे फिर्यादीने खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg