loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली येथे कौशल्य प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत निर्मल ग्रामपंचायत वरवेली आयोजित श्री बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गट, शेतकरी कौशल्य प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर वरवेली ग्रामपंचायत मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन वरवेली ग्रामपंचायतचे सरपंच नारायण आगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला दापोली कृषी विद्यापीठातील कृषी तज्ञ, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी, कृषी विभागाचे कृषी अधिकारी तसेच ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड त्याचप्रमाणे उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेखर विचारे व गावातील शेतकरी उपस्थित होते. या कृषी मेळाव्यामध्ये पंचक्रोशीतील १२९ शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. गुहागरचे तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांचे नियोजनबद्ध आयोजनाखाली पार पडलेल्या या मिळाव्यामध्ये भात, सुपारी, आंबा, काजू तसेच गो-आधारीत शेती यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना याविषयी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी परीट यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची विस्तृत माहिती दिली. विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि कृषी कृषी विभागाचे अधिकारी यांनी वरवेली गावातील प्रगतशील शेतकरी व कृषी उद्योजक देसाई यांच्या आंबा व काजू बाग तसेच प्रक्रिया युनिटला भेट देऊन मार्गदर्शन केले. दापोली कृषी विद्यापीठातर्फे डॉ. देसाई डॉ. खानविलकर डॉ. चव्हाण,पाटील यांनी मार्गदर्शन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg