loader
Breaking News
Breaking News
Foto

वणौशी गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - नामदार योगेशदादा कदम

दापोली (प्रतिनिधी) : गावाच्या विकासासाठी तुम्ही सगळे एकत्र आलेलेच आहात. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असेल तर विकासाच्या कामात अडथळा येत नाही. पुढे होणा-या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वणौशी ग्राम पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवा. आज आपण ग्राम पंचायत कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी, काजूवाडी रस्ता डांबरीकरणासाठी तसेच भिवबंदर आघारी तिवरेवाडी रस्त्याच्या कामासाठी खूपच मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. असे यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याचे काम कधीही झाले नव्हते ते आपण केले आहे. यापुढे देखील वणौशी गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशाप्रकारचा विश्वास नामदार योगेशदादा कदम यांनी वणौशीतील विविध विकास कामांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना उपस्थित ग्रामस्थांना दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी दुमदेव ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील हद्दीत महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे) महसूल ग्राम विकास व व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि औषध प्रशासन राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या शुभहस्ते बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत बांधणी योजनेंतर्गत निर्मल ग्राम पंचायत वणौशी तर्फे पंचनदी दुमदेव ग्रामपंचायत इमारत बांधणे या विकास कामासाठी २० लाख रुपये, वणौशी तर्फे पंचनदी काजूवाडी येथील रस्ता डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० लाख रुपये तर भिवबंदर आघारी तिवरेवाडी रस्त्याच्या कामासाठी तब्बल ३ कोटी २३ लाख १२ हजार रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्या विकासकामांचे धुमधडाक्यात भूमीपूजनाचे कार्यक्रम पार पडले.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाला वणौशी तर्फे पंचनदी दुमदेव ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिभा दवंडे, उपसरपंच प्रकाश तेरेकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, तालुका प्रमुख उन्मेष राजे, महिला आघाडी तालुका संघटीका दिप्ती निखार्गे, विभाग प्रमुख दिपक घडसे, माजी प.स.सदस्य सुंदर राणे, वणौशी ग्राम पंचायतीचे माजी सरपंच अशोक जाधव, वंदना निंबकर, ग्रामपंचायत अधिकारी अनंत कोळी, संजय दळवी, चंद्रकांत निवणकर, रमेश पाटणे, नारायण मिरगळ, दत्ताराम गुरव, सुनिल पांदे, दत्तप्रसाद मोरे, महेश भुवड, सुहासिनी कुटरेकर, प्रभाकर बुरबांडकर, सुनील बुरबांडकर, गोपाळ परांजपे, संजय बारे, विजय गुरव, महेश गुरव, प्रभाकर राणे, रोहन तोडणकर, उसगाव सरपंच मृदुळा गोयथळे, चेतन रामाणे, वर्षा आग्रे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg