loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका' स्पर्धा; नाशिक, जळगाव व कोल्हापूर या केंद्रांची प्राथमिक फेरी उत्साहात

पनवेल (प्रतिनिधी) :- रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या 'राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका' स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष असून त्या अंतर्गत राज्यातील प्राथमिक केंद्रांच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ झाला. त्यानुसार नाशिक, जळगाव व कोल्हापूर या केंद्रांची प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली. नाट्य चळवळ वृद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धींगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीदवाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्टये आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत नवनवीन संकल्पना आणि दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला असून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे. गेल्या ११ वर्षांत स्पर्धेने नाट्यविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, सर्वोत्तम स्पर्धास्थळ आणि दर्जेदार परीक्षणामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. नाशिक, जळगाव व कोल्हापूर या केंद्रांची प्राथमिक फेरी संपन्न झाली. कोल्हापूर केंद्रामधील आर्टस कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज नागठाणे च्या 'सोयरीक', राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय इस्लामपूरच्या 'हाफवे', तर नाशिक व जळगाव केंद्रातून वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान शाखा नागपूरच्या 'वि. प्र. ' आणि अभिनय नाट्य कला लोंढे चाळीसगावच्या 'गाईड' या एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

टाईम्स स्पेशल

या प्राथमिक फेरीसाठी परीक्षक प्रमोद शेलार व राजा अत्रे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, मोल खेर, गणेश जगताप, चिन्मय समेळ आदी उपस्थित होते. या नंतर आता पुढील पुणे, रायगड, मुंबई या केंद्रांची प्राथमिक फेरी संपन्न होणार असून महाअंतिम फेरी ५, ६ आणि ७ डिसेंबर रोजी पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. स्पर्धेतील अंतिम फेरीतील विजेत्या प्रथम क्रमांकास एक लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक, तसेच इतर पारितोषिके देऊन कलाकारांना गौरविण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg