loader
Breaking News
Breaking News
Foto

खरवते-दहिवली येथे स्पोर्टेक्स -2025 आंतर महाविद्यालयीन क्रीडा संग्राम उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - चिपळूण तालुक्यातील‌ शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे दोन दिवशीय स्पोर्टेक्स- 2025 क्रीडा संग्राम उत्साहात संपन्न झाला. यावेळी डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली संलग्न महाविद्यालयांच्या कबड्डी व व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, कोकण कृषि विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ.संतोष सावर्डेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आम. शेखर निकम व डाॅ. संतोष सावर्डेकर यांचे हस्ते या सर्व स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, डॉ.अरुण माने, संचालक, क्रिडा व सह शैक्षणिक उपक्रम, संदीप थोरात, क्रीडा अधिकारी, डॉ.बा. सा.को.कृ.वि. दापोली, मारुतीराव घाग, संस्था संचालक, महेश महाडीक, संस्था सचिव, सरपंच कल्पना घाग, विकास घाग, रुपेश घाग, अनंत घाग, रफीक मोडक, प्रा.संजय देसाई, प्रा.उमेश लकेश्री उपस्थित होते. स्पोर्टेक्स - 2025 मध्ये कोकणातील सुमारे 20 कृषि महाविद्यालये व 600 विद्यार्थी खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी आम.शेखर निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व खेळाडुंना प्रोत्साहित करत आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी उलगडले. खेळ हा आपल्याला शिस्तबद्ध बनवतो तसेच वेळोवेळी कठीण प्रसंगात योग्य निर्णय व नियोजनाचे धडे देतो असे प्रतिपादन केले. तसेच शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य व राष्ट्रीय दर्जा च्या क्रीडा संकुलाविषयी उपस्थित खेळाडुंना मार्गदर्शन केले. डाॅ.संतोष सावर्डेकर, प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, डाॅ.अरुण माने यांनी ही उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या अनमोल मनोगत मधुन प्रोत्साहित केले. या स्पर्धांमध्ये कबड्डी (मुले) क्रीडा प्रकारामध्ये यजमान शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. तर कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली उपविजेते ठरले. कृषि महाविद्यालय, सांगुळवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कबड्डी (मुली) क्रीडा प्रकारामध्ये कृषि महाविद्यालय, दापोली हे विजेते ठरले. तसेच उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयानी तृतीय क्रमांक पटकावला. व्हॉलीबॉल (मुली) क्रीडा प्रकारात कृषि महाविद्यालय, दापोली यांनी विजेतेपद पटकावले.

टाईम्स स्पेशल

तसेच उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे हे उपविजेते ठरले. तर उद्यान विद्या महाविद्यालय, दापोली यांनी तृतीय क्रमांक मिळवला. व्हॉलीबॉल (मुले) क्रीडा प्रकारात कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोली हे उपविजेते ठरले. यामध्ये शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व महाविद्यालया मधील यशस्वी खेळाडुंचे सर्व मान्यवरांकडुन प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयातील सर्व विजेते व सहभागी खेळाडुंना प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, क्रीडा निर्देशक प्रा.सुहास आडनाईक, प्रा.पी.बी.पाटील, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धांसाठी प्रा.डॉ.एच.एस.भागडे, प्रा.व्हि.एम.साळवी, प्रा.एस.एम.कदम यांनी सूत्रसंचालन आणि समालोचन केले. विद्यापीठाचे कुलसचिव, संचालक व सर्व क्रीडा प्रतिनिधी यांनी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थापनाविषयी व सहकार्या बद्दल गौरवोद्गार काढले आणि संस्था व प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे विशेष आभार मानले. या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालया मधील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg