loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबये सकपाळ दत्तवाडी येथे गुरुवारी श्रीदत्तात्रेय जयंती उत्सव

खेड (वार्ताहर) : तालुक्यातील आंबये सकपाळ दत्तवाडी येथे गुरुवार दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी श्री दत्तगुरु देवस्थान सकपाळ व दत्तवाडी आंबये ग्रामस्थ ठाणे/मुंबई/ पुणे मंडळ व महिला मंडळ आंबये दत्तवाडी यांच्यावतीने दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानिमित्ताने मंगळवार दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ७ ते ८ - आंबये सकपाळ, दत्तवाडी यांचा एकत्रित हरिपाठ व भजन, दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ६ ते ७ - दिपोत्सव, सायं. ७ ते ८ - हरिपाठ, रात्रौ ८ ते ९ - महाप्रसाद, रात्रौ १० ते ११:३० - भजन, दत्तजयंती गुरुवार दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ ते ९ - पूजा, अभिषेक व होमहवन, सकाळी ९ ते ११:३० - ध्वजारोहन, सकाळी ११:३० ते दुपारी १ - दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व ट्रस्टच्या अध्यक्षांचे मनोगत, दुपारी १ ते २ - संगीत खुर्ची, चमचा लिंबु व इतर लहान मुलांच्या स्पर्धा, दुपारी ३ ते ५ - गुरुचरित्र वाचन, सायं. ५ ते ६ - श्रीदत्त जन्मकाळ, सायं. ६:३० ते ७:३० - हरिपाठ,रात्रौ ७:३० ते ८:३० महाप्रसाद, रात्रौ ८:३० ते ९:३० - दिंडी, रात्रौ ९:३० ते ११:३० - किर्तन. रात्री ११:३० ते पहाटे ४ वा. चिपळूण तालुक्यातील कोंढे माळ- गोपाळवाडी येथील साईनाथ नमन नाट्य मंडळ यांचे बहुरंगी नमन. शुक्रवार दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ४ ते ५ - सकपाळ व दत्तवाडी यांची एकत्रित काकड आरती सोबत श्री दत्त पादुका पालखी प्रदक्षिणा, सकाळी ९ ते ११ श्री सत्यनारायणाची महापूजा आणि दुपारी ११ ते १ या वेळेत महाप्रसादाने श्रीदत्त जयंती उत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व दत्त भाविकांनी उत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg