loader
Breaking News
Breaking News
Foto

साळविंडे गावात नव्याने उभारलेल्या भैरवनाथ मंदिराचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

रायगड - तालुक्यातील साळविंडे देवळाचीवाडी येथील ग्रामस्थांनी परिश्रम व भक्तिभावातून उभारलेले भैरवनाथ मंदिर अत्यंत आकर्षक,प्रसन्न आणि कोकणातील प्राचीन मंदिरांची आठवण करून देणारे असल्याचे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी गौरवोद्गार काढले.मंदिर लोकार्पण व स्वागत समारंभात त्या बोलत होत्या.यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद,उत्साह पाहून मोठे समाधान मिळाल्याचे त्या म्हणाल्या.मंदिर उभारणी कामात हातभार लावता आल्याचा विशेष आनंद त्यांनी व्यक्त केला.या प्रसंगी त्यांनी “साळविंडे ग्रामपंचायत विस्ताराच्या मागणीची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन देताना खासदार सुनिल तटकरे यांनी आदर्श संसद ग्राम योजनेतून खरसई ग्रामपंचायत दत्तक घेऊन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून विकास कामे केली आहेत.त्याचप्रमाणे मतदारसंघातील प्रत्येक सहा महिन्यांनी सुचविल्या जाणाऱ्या पाच ग्रामपंचायतींच्या यादीत साळविंडेचा समावेश राहील.गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात हायमास्ट दिवे बसविण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.मागील १५ वर्षांत साळविंडे ग्रामपंचायत हद्दीत आमच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली असून मंजूर योजनेच्या प्रत्येक यादीत साळविंडेचा उल्लेख असतो. पूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत आता झालेला विकास गावातील प्रत्येकाला जाणवत असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंदिर बांधकामाचे कौतुक करताना त्यांनी मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरणात ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन गावातील सर्वांच्या सुख-समाधानासाठी प्रार्थना केली.ग्रामस्थांची सेवा गोड मानून ती पुढेही करण्याची प्रेरणा या मंदिराच्या माध्यमातून मिळत राहो अशा त्या म्हणाल्या.मंदिर उभारणी कामाला मंत्री आदिती तटकरे यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वेळी त्यांचे समावेत माजी सभापती बबन मनवे,मुंबई अध्यक्ष महेश शिर्के,जेष्ठ नेते अंकुश खडस,लक्ष्मण भाये,सरपंच उद्देश पारदुळे,मधुकर गायकर,महिला अध्यक्षा मीना टिंगरे,सोनल घोले,रेश्मा कानसे,वनिता खोत,महेश घोले,अनिल बसवत,किरण पालांडे,शेखर खोत,गजानन पाखड,नंदकुमार सावंत,प्रकाश गाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg