loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यात डंपरचालकाला बंदुकीचा धाक; करजुवे-वाटवाडी परिसरात खळबळ

संगमेश्वर (प्रतिनिधी) - करजुवे ते माखजन मार्गावर डंपरचालकाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी माखजन पोलिस दुरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद एकनाथ साळुंखे (वय २५, रा. चिखली साळुंखेवाडी) हे एमएच 08 एपी 6534 क्रमांकाच्या डंपरमध्ये करजुवे येथे वाळू भरून माखजनच्या दिशेने जात होते. दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता करजुवे गावात डंपर थांबवून सुरज उदय नलावडे (वय 26, रा. करजुवे वातवाडी) हा फिर्यादीजवळ आला आणि डंपरची चावी मागू लागला. चावी का हवी असा जाब विचारल्यावर आरोपी संतापला. दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने त्याच्या सोबत असलेली ग्रे रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक अज्ञात) डंपरसमोर आडवी लावून रस्ता रोखला. त्यानंतर कारमधून सिंगल बॅरल काडतूस भरलेली बंदूक घेऊन आरोपी खाली उतरला. डंपरचा दरवाजा उघडून चावी काढून घेतली आणि “तुझ्या शेटच्या धाडस असेल तर माझ्या घरातून चावी घेऊन जा” अशी धमकी दिली. घाबरलेल्या फिर्यादीने तत्काळ माखजन पोलिस दुरक्षेत्रात माहिती दिली. त्यानुसार आकरन्स क्रमांक 61/2025 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

या कारवाईस मपोहेकॉ/1388 वाय. व्ही. बरगाले यांनी गुन्हा दाखल केला असून, तपास श्रेणी पोउनि व्ही. डी. साळवी हे करीत आहेत. घटनेची माहिती वरिष्ठांना वायरलेस संदेशाद्वारे देण्यात आली आहे. या प्रकारामुळे करजुवे-माखजन परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg